शिवजयंतीच्या नियमावलीवरुन भाजप नेत्यांची टीका; खासदार उदयनराजे मात्र, ठाकरे सरकारच्या बाजूने

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजप नेत्यांनी सरकारावर टीकेची झोड उडवली आहे. मात्र, भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मात्र, ठाकरे सरकारच्या बाजूने भूमिका मांडली आहे.

  सातारा : १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजप नेत्यांनी सरकारावर टीकेची झोड उडवली आहे. मात्र, भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मात्र, ठाकरे सरकारच्या बाजूने भूमिका मांडली आहे.

  कोरोना महामारीत अनेकांचा जीव गेला. अनेकांनी आपली जवळची लोकं गमावली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. परंतु आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासन अशा सर्वांचीच जवाबदारी असल्याचे उदयनराजे म्हणाले.

  शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या,” असा अवाहनही उदयनराजे भोसले यांनी केले.

  अशी आहे शिवजंयतीसाठीची नियमावली

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याच्या कार्यक्रमावेळी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.