रामायणावरुन साताऱ्यात राजकारण! भाजपा आमदाराला अना‌वधान अंगलट

एका कार्यक्रमात गोरे म्हणाले की, रामायणातील लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो. यानंतर गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती, असे विधान त्यांनी केले. विशेष म्हणजे, या शब्दाचा त्यांनी दोनदा पुनरुच्चारही केला.

    सातारा : सातारच्या माण खटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरे(BJP MLA Jayakumar Gore ) प्रभू श्री रामचंद्रांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच गोत्यात आले आहे. गोरे यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाची गोची झाली असून शिवसेनेला आयते कोलीत मिळाले आहे.

    एका कार्यक्रमात गोरे म्हणाले की, रामायणातील लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो. यानंतर गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती, असे विधान त्यांनी केले. विशेष म्हणजे, या शब्दाचा त्यांनी दोनदा पुनरुच्चारही केला.

    आमदार गोरे यांना ही बाब उपस्थितांनी निदर्शनास आणून दिली. यानंतर गोरे यांनी, रामाची नव्हे तर रावणाची नियत खराब होती, अशी दुरुस्ती केली. गोरे यांनी अनावधानाने ही चूक केली असली तरी सध्या त्यांचा व्हीडिओ सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. अनेकजण या विधानाची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान, गोरे यांचा शिवसेनेने जाहीर निषेध केला असून प्रभू श्रीराम, रावण, बिभीषण हे रामायणात होते का महाभारतात हे माहित नसलेले भाजपाचे आमदार गोरे यांना शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पोस्टाद्वारे रामायण ग्रंथाची एक प्रत पाठविली आहे.

    रामायण-महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून त्याची कोणतीही बदनामी आम्ही सहन करणार नाही. हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, जर तुम्हाला रामायण अथवा महाभारतातील संदर्भ माहीत नसतील तर ते ग्रंथ वाचण्याची खूप गरज आहे. आता ब्रँडेड कोकणचे खासदार गोरे यांच्या श्रीमुखात लावणार का?

    - मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना