कराडात भाजप ओबीसी आघाडीचे निषेध आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

    कराड : आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडाणुका जाहीर केल्याबद्दल भाजप कराड शहर दक्षिण व ओबीसी आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले.

    राज्यातील आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष एकनाथबागडी यांनी केला. येथील दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर हातात निषेध फलक घेऊन निषेध नोंदवला.

    या आंदोनलनात ओबीसी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र डुबल, शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, अल्पसंख्यांक आघाडी शहर अध्यक्ष नितीन शहा, अनुसूचित मोर्चाचे शहर अध्यक्ष सागर लादे, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष सुनील नाकोड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.