ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपची साताऱ्यात निदर्शने

    सातारा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून, आज (बुधवार) साताऱ्यात भारतीय जनता पक्षाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत जोरदार निदर्शने केली. सातारा शहरातील पोवई नाका येथे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करीत ठाकरे सरकारविराेधात जोरदार घोषणाबाजी केली.

    ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या पाठीशी आहे. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील, असे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी नमूद केले.

    यावेळी भाजपच्या महिला माेर्चाच्या नेत्या सुवर्णा पाटील म्हणाल्या, सातारा पालिका निवडणुकीत ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना आम्ही पाठबळ देऊ. त्यांना आमचा नेहमीच पाठींबा राहील. या समाजातील उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नशील राहू.