There will be no more autopsy; Home Department Order

    सातारा : येथील एमआयडीसी येथील बोर फाटा याठिकाणी आज (बुधवार) सकाळी आठच्या सुमारास चारचाकीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.

    पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाहनानजीक केक कापण्यात आला आहे. यामुळे हा घातपात असू शकताे. त्यादृष्टीने तपास करीत आहाेत असे पाेलिसांनी नमूद केले. या प्रकरणाचा सखोल तपास सातारा पोलिस दल करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

    संबंधित वाहनाचे पासिंग हे पुण्याचे आहे. या वाहनाचा क्रमांक एमएच १२ एफएक्स ४८४० असा आहे. या वाहनातील मृत व्यक्तीचे नाव रविंद्र यशवंत शेलार (वय 40) (रा. कारंडवाडी) असे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.