बेकायदा लाकूड वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात ; जागतिक जैवविविधता दिनीच वनविभागाची अंबेदरे येथे कारवाई

साताऱ्याचे मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांना गडकर आळी येथून लाकूड मालाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती .वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, वनपाल दीपक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार , वनरक्षक विजय भोसले या वन विभागाच्या पथकाने सुनील भोईटे, ड्रॉगो अध्यक्ष सुधीर सुकाळे, ओंकार ढाले या सहकाऱ्यांसह अंबेदरे परिसरात शनिवारी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले .

    सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या मौजे आंबेदरे ता सातारा येथे लाकडाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना वन विभागाने सापळा रचून पकडले . जागतिक जैवविविधता दिनाच्या दिवशीच झालेल्या कारवाईत आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

    या प्रकरणी प्रल्हाद वसंतराव शेंडगे, ( गडकर आळी ) व बाजीराव प्रकाश लोंढे रा आकाशवाणी झोपडपट्टी यां दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे . या कारवाईत दोन ट्रॅक्टर, एक पिकअप व लाकूडफाटा असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . संबंधितांविरूध्द भारतीय वन अधिनियम १९२७नुसार गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे .