महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का? पत्रकारांच्या प्रश्नाला उदयनराजेंचे जबरदस्त उत्तर

सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण ढवळू लागले आहे. त्यातच आता निसर्गाचा आणि समाजाचा समतोलही ढासळत चालला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले, त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

    सातारा : सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण ढवळू लागले आहे. त्यातच आता निसर्गाचा आणि समाजाचा समतोलही ढासळत चालला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले, त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

    दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का?, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, कोणी कोणालासोबत घेऊन लढायचे ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मी तर एकटाच लढतोय. निवडणुकीऐवजी स्पर्धा ठेवली, तर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. या लोकांना मतदारांची गरज आहे. पण, काही प्रश्नांवर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना विचारा, आपण काय केले पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

    हे सुद्धा वाचा