उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    सातारा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साताऱ्यात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी भवन सातारा येथे अजित पवार यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

    अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीमध्ये अनेक मुलांनी आपले आईवडील गमावले, दुर्दैवाने लहान वयातच त्यांच्या वाट्याला पोरकेपण आले आहे. तरी अशा मुलांना त्यांना आयुष्यभर साथ देणारा, मायेने त्यांच्याशी आपुलकीचे नाते जोडणारा स्वयंसेवक असणे गरजेचे झाले आहे.

    आपल्या व्यवसायापलीकडचे हे नाते या मुलांच्या मनामध्ये नवा विश्वास निर्माण करेल, अशा सेवाभावी कार्यकर्त्यांची निवड करुन त्यांना यापैकी प्रत्येकी एका बालकांशी नाते निर्माण करण्याचा राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जिवलग, नाते आपुलकीचे’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ गुरुवारी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाला. सातारा जिल्ह्यातील अशा बालकांची जबाबदारी स्वयंसेवक या नात्याने राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्षा पूजा काळे, विद्यार्थी अध्यक्ष वैभव कळसे, युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलबडे, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक अतुल शिदे व युवक पदाधिकारी यांनी हाती घेतली आहे.

    तसेच महिला आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच सेवादलाच्या वतीने शासकीय भिक्षेकरी गृह बंधे फळे व सॅनिटायझरचे वाटप, वृक्षारोपण करण्यात आले. अल्पसंख्यांक सेलच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि अनाथ आश्रमामध्ये खाऊ वाटप करण्यात आले.

    या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सरचिटणीस सचिन बेलागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, सेवादल प्रदेश संघटक राजेंद्र लावघरे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न बाबर, चित्रपट व सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाळकृष्णा शिंदे, सेवादल प्रदेश संघर्टीका सिमा जाधव, कुसुमताई भोसले, नलिनी जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.