चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. बारामतीच्या वतीने ‘मिशन ऑक्सिजन’ महिमेचा शुभारंभ

  सातारा : सध्या भारतात आणि जगात महामारीची जी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. मागील वर्षी या महामारीच जे रूप होत ते यावर्षी बदललेलंही आपण पाहिलं. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे मागल्या वर्षी वेगळे प्रश्न होते आणि आज वेगळे प्रश्न आहेत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेचा.

  वेळेसह आधुनिक होत जाणाऱ्या जगात झाडांची मोठी कत्तल होत गेली. त्याचा परिणाम असा झाला की पर्यावरणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. जर जगात झाडचं नसतील, तर कितीही फॅक्टरी लावल्या, तरी ऑक्सिजन कमीच पडणार असल्याचं त्रिकालबाधित सत्य या काळात आपल्या समोर आलं.

  जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात जर जांभूळ, कडुलिंब, पिंपळ, वड, अशोक अशाप्रकारची पाच झाडं अधिकाधिक लावली गेली असती, तर देशात ऑक्सिजनची कमतरता भासलीच नसती .

  खरं तर ‘ झाड लावणं आणि त्याच जतन करणं हा एक संस्कार आहे . हा संस्कार रुजविण्याचं काम मिशन ऑक्सिजन मोहिमेच्या माध्यमातून चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्णपेढीने हाती घेतलेले आहे.

  बारामती शाखेत मिशन ऑक्सिजन मोहिमेचा उदघाट्न सोहळा पार पडला. विजय पाटील, तहसिलदार, बारामती दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, बारामती, मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती आणि किशोरकुमार शहा, चेअरमन, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. बारामती अशा मान्यवरांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

  येत्या काही दिवसामध्ये चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा . लि . सुवर्णपेढीच्यावतीने बारामती क्लस्टर मधील गांधी चौक, कचेरी रोड बारामती, एम. आय. डी. सी. बारामती आणि अकलूज शाखेमध्ये मिशन ऑक्सिजन ही वृक्षरोपणाची मोहीम चालू असणार आहे. या मोहिमेअंतर्गत खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सदरचे सीड बॉल त्याची लागण आणि संगोपनाच्या सविस्तर माहितीसह मिशन ऑक्सिजन मोहिमेअंतर्गत मोफत दिले जाणार आहेत .

  उदघाटनप्रसंगी बोलताना किशोरकुमार शहा यांनी सांगितले की, उत्तरोत्तर ग्राहकांच्या प्रतिसादाच्या जोरावर आणि वृक्षसंवर्धनासाठी काम करीत असलेल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक संस्थेला मिशन ऑक्सिजन मोहिमेत सामील करून घेतलं जाणार आहे.