सरकार चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार चांगली माणसे आहेत पण… संभाजी भिडेंचा घणाघाती आरोप 

वारीला बंदी घालून शासनाने मोठे अपराधी कृत्य केले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा कोणताही अधिकार नाही. सरकार चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार व विश्वजीत कदम अत्यंत चांगली माणसे आहेत. ते शासन चालवत आहेत. पण, ते चुकले आहेत. आपण त्यांना क्षमा करूया. मात्र, चुक त्वरित दुरुस्त केली पाहिजे.

    कराड: नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. वारी बंदी म्हणजे भारताच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे. वारीबाबत राज्य शासनाची कृती दुर्योधन व दुःशासनासारखीच आहे, असा घणाघाती आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला.

    परंपरा खंडीत करण्याचा सरकारला अधिकार नाही

    वारीला बंदी घालून शासनाने मोठे अपराधी कृत्य केले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा कोणताही अधिकार नाही. सरकार चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार व विश्वजीत कदम अत्यंत चांगली माणसे आहेत. ते शासन चालवत आहेत. पण, ते चुकले आहेत. आपण त्यांना क्षमा करूया. मात्र, चुक त्वरित दुरुस्त केली पाहिजे.

    बंडातात्यांसारखा संत सध्या कुठेच मिळत नाहीत. ‘संत पावले साजरी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारी होणारच, मात्र आता त्याला बंदी आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने निषेध करायला हवा. ज्या-ज्या गावात वारीचा मुक्काम असतो. त्या गावात आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येवून मुक्कामच्या दिवशी त्या मुक्काम स्थळी येवून त्यांना आदरांजली वाहूया. एकादशीला प्रत्येक गावात विठ्ठलाची आरती करावी असेही ते म्हणाले.