चार भिंती परिसरातील लगतच्या चरींची स्वच्छता ; उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची कार्यतत्परता

चार भिंती या ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरा लगत शाहूपुरी भागातील असणाऱ्या सोसायटया व सदनिकांमध्ये डोंगर उतारावरचे पावसाचेपाणी घरात जाऊन नुकसान होण्याची समस्या होती . साताऱ्याचे उद्योजक व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक सागर भोसले यांनी या अडचणीची कल्पना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिली

    सातारा : चार भिंती परिसरातील डोंगरउतारावरून वहात येणाऱ्या पाण्याचा शाहूनगर परिसरातील नागरिकांना त्रास होत होता . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी रविवारी पालिकेची यंत्रणा कामाला लावून डोंगर भागाच्या चरी पुन्हा खणून त्यांची स्वच्छता केली .

    उपनगराध्यक्षांच्या या कार्यतत्परतेचे शाहूनगर वासियांनी मनापासून कौतुक केले . चार भिंती या ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरा लगत शाहूपुरी भागातील असणाऱ्या सोसायटया व सदनिकांमध्ये डोंगर उतारावरचे पावसाचेपाणी घरात जाऊन नुकसान होण्याची समस्या होती . साताऱ्याचे उद्योजक व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक सागर भोसले यांनी या अडचणीची कल्पना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिली . रविवार सुट्टीचा दिवस असताना उपनगराध्यक्ष एक तासाच्या आत एक जेसीबी व पाच कर्मचाऱ्यांची टीम घेऊन हजर झाले . कर्मचाऱ्यांनी बुजलेल्या चरीतील दगड कचरा काढून त्या स्वच्छ केल्या . येत्या पावसाळ्यात डोंगरावरचे पाणी वाहून कोणाच्या घरात पाणार नाही यासाठी सर्व चरी मुख्य गटाराशी जोडल्या . या कार्य तत्परतेबद्दल शाहूनगर वासियांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .