कोरोनाच्या संकटात आ. शिवेंद्रसिंहराजे वाढदिवस साजरा करणार नाहीत ; केलं ‘हे’ आवाहन

हितचिंतक, स्नेही, मित्रमंडळी, चाहते, कार्यकर्ते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करू नये. नागरिकांना अडचण ठरेल, रस्ता अडवला जाईल अथवा वाहतुकीला बाधा ठरेल अशा पद्धतीने फ्लेक्स लावू नयेत. फ्लेक्स लावताना आवश्यक त्या सर्व विभागाच्या रीतसर परवानग्या घ्याव्यात आणि योग्य त्या ठिकाणीच फ्लेक्स लावावेत असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

    सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस ३० मार्च रोजी असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

    गत वर्षीही कोरोना महामारीमुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता. या वर्षीही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत असून कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे यंदाही आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम होणार नाही त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी अथवा अन्य कारणाने कोणीही कुठेही गर्दी करू नये. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे आणि आपल्यामुळे कोरोना वाढू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

    हितचिंतक, स्नेही, मित्रमंडळी, चाहते, कार्यकर्ते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करू नये. नागरिकांना अडचण ठरेल, रस्ता अडवला जाईल अथवा वाहतुकीला बाधा ठरेल अशा पद्धतीने फ्लेक्स लावू नयेत. फ्लेक्स लावताना आवश्यक त्या सर्व विभागाच्या रीतसर परवानग्या घ्याव्यात आणि योग्य त्या ठिकाणीच फ्लेक्स लावावेत असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वानीच प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वानीच जागरूक रहावे तसेच गरजू लोकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.