मराठा आरक्षण संदर्भात एकत्र या : हर्षवर्धन पाटील

माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या उपस्थितीत खंडाळा तालुक्यातील मराठा बांधवांची घेतली भेट

    मराठा आरक्षणांच्या संदर्भात सातारा जिल्ह्यात दोन दिवसांच्या दाैऱ्यावर हर्षवर्धन पाटील आलेले असताना खंडाळा तालुक्यातील मराठा बांधवांची भेट घेतली , ही बैठक माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा येथे पार पडली , जवळपास एक तास चर्चा केली. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाकडून रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळाव, यात कायदेशीर, घटनात्मक बाबींचा विचार करून हा प्रयत्न चालू आहे.

    आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळे पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना राज्य सरकार कुठे कमी पडले, काही त्रुटी राहिल्या आहेत का यांचा विचार करत आहोत. सर्व मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याची विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केली . यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष विक्रमजी पावसकर,ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे सर, अनिरुद्ध दादा गाढवे, युवा नेते यशराज भैय्या भोसले, नगराध्यक्ष खंडाळा प्रल्हाद खंडागळे,किसनवीर कारखान्याचे संचालक राहुल घाडगे, संभाजीराव जाधव, युवराज गाढवे,श्रीकांत घाटे, मनोज पवार यांसह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.