इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची साताऱ्यात निदर्शने

    सातारा : मोदी हटाव देश बचाव, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, भाजपा हटाव देश बचाव अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल चालवून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.

    यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली.
    काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, ऍड. विजयराव कणसे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, अजित चिखलीकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, मालनताई परळकर, सुषमाराजे घोरपडे, सातारा तालुकाअध्यक्ष माधुरी जाधव, रजनी पवार, रोहिणी यादव, दीपाली यादव, बानुबी शेख, माधुरी चव्हाण, नरेश देसाई, धैर्यशील सुपले, चंद्रकांत ढमाळ, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, प्रमोद अनपट आदींनी सायकली चालवत काँग्रेस कमिटी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेवून तेथे मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

    यावेळी बोलताना डॉ. सुरेश जाधव म्हणाले, मोदींच्या काळात जो काय कारभार झाला आहे. त्यामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सामान्य लोकांच्या अवाक्याच्या बाहेर गेलेले आहे. लोकांना दिलासा देण्याचे कोठेही आपल्याला दिसत नाही. करोडो रुपयांची लुट सुरु आहे. म्हणून सातारा ज्sिाल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल रॅलीचे नियोजन करुन लोकांचा उद्रेक जनतेपर्यंत पोहचवला जातो.  पेट्रोल, डिझेलवर १८ रुपये रस्ते विकास असेल चार रुपये कृषी सेस घेतले जातात. मोदी सरकारने डिझेल, पेट्रोलवर एक्साईज डय़ुटी लावली आहे. तब्बल ७ वर्षात २२ कोटी नफा मिळवला आहे. अशा परिस्थिती १०० रुपये पेट्रोल पार करुन आणि गॅस सिलिडंर ८५० पार करुन लोकांच्या आवाक्याचे बाहेरचे काम केलेले आहे, असे मत व्यक्त केले आहे.