वडूज(सातेवाडी) येथे कोरोना सेंटर सुरू ;  माजी सभापती संदीप मांडवे यांच्या सहकार्यातून रुग्णांना मदत

कोरोनाचा प्रसार हा रोज वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वर ताण येवून लोकांची गैरसोय होत आहे. कुणी तरी करायला पाहिजे, काहीतर करायला पाहिजे या हेतूने संदीप मांडवे यांनी कोविड आयसोलेशन सेंटर उभ करायच ठरवल.

    दहिवडी : राजकारण बाजूला ठेवून गेले वर्षभर कोरोना रुग्णांना मदत करणारा आणि वेळप्रसंगी रुग्णा जवळ थांबून लागेल ती मदत करणारा योद्धा माजी सभापती संदीप मांडवे यांनी वडूज(सातेवाडी) येथे कोरोना सेंटर सुरू केलं असून जोपर्यंत कोरोना प्रसार आहे, तोपर्यंत हे आयसोलेशन सेंटर सुरू ठेवण्यात येणार आहे.

    कोरोनाचा प्रसार हा रोज वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वर ताण येवून लोकांची गैरसोय होत आहे. कुणी तरी करायला पाहिजे, काहीतर करायला पाहिजे या हेतूने संदीप मांडवे यांनी कोविड आयसोलेशन सेंटर उभ करायच ठरवल.

    सातेवाडी येथे मधुमाला मंगल कार्यालय येते नवीन “हुतात्मा स्मृती कोविड आयसोलेशन सेंटर” सुरू केले या मध्ये जनता गॅरेज मित्र परिवार आणि सातेवाडीचे सरपंच हणमंत कोळेकर तसेच सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने लाभले.

    १ मे रोजी उद्घाटन करून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध केले. हे कोविड आयसोलेशन जोपर्यंत कोविड चा प्रसार थांबत नाही तोपर्यंत चालू राहील. आतापर्यंत ५० बेड ची सुविधा उपलब्ध केली आहे. हळूहळू बेड वाढवण्यात येतील. असंही संदीप मांडवे यांनी सांगितले.उद्घाटन वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री रमेश काळे साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युनुस शेख, नगराध्यक्षा सुनिल गोडसे, सातेवाडीचे माजी सरपंच हणमंतर कोळेकर, ग्रा प सदस्य सचिन बोटे, डॉ.संतोष मोरे, आनंद पवार, महेश इगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्ष गोडसे, धनंजय क्षीरसागर, धनाजी गोडसे यांचेही मनोगत झाले. दरम्यान माजी नगराध्यक्ष डॉ.महेश गुरव, माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, इम्रान बागवान आदिनीही उद्धाटनानंतर भेट दिली.