corona update satara

गेल्या २४ तासात सातारा जिल्हात ८०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार १४७ वर गेली आहे. जि्ह्यात एकूण ८ हजार ४८३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे ५८२ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

सातारा : साताऱ्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला आहे. दिवसेंदिवस साताऱ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आश्चर्याची बाब आहे की सुरुवातीच्या काळापासूनच साताऱ्यात कोरोनाचा लवलेशही नव्हता. परंतु अनलॉक प्रक्रियेच्या नंतर साताऱ्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

गेल्या २४ तासात सातारा जिल्हात ८०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार १४७ वर गेली आहे. जि्ह्यात एकूण ८ हजार ४८३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे ५८२ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

साताऱ्यात आतापर्यंत १३ हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ५३ हजार ६२८ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.