Corona Virus Image

सातारा जिल्ह्यात  (Satara District) कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी ८९८ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्याचप्रमाणे ३५ जणांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान (Active ) मृत्यू झाला आहे. अशी माहिती येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Shubhas Chavan) यांनी दिली.

सातारा : सातारा जिल्ह्यात  (Satara District) कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी ८९८ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्याचप्रमाणे ३५ जणांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान (Active ) मृत्यू झाला आहे. अशी माहिती येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Shubhas Chavan) यांनी दिली. सातारा जिल्ह्यात काल सोमवारी एकूण ५७ हजार ३६९ जणांची कोरोना चाचणी (Corona Test) नमुने घेण्यात आले होते. यापैकी १५ हजार ५९४ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होत आहे. दोन दिवसातंच ही संख्या २५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून एकूण संख्या २५ हजार ४७६ इतकी झाली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात एकूण ७२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ९ हजार १५७ इतके रूग्ण अँक्टिव्ह आहे.

सातारा जिल्ह्यात आढळलेले रूग्ण :

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात साकर्डी ता. कराड, व्यंकटपुरा पेठ सातारा, रहिमतपूर, नित्रळ, नुने , सदरबझार, पंताचा गोट, शाहूपुरी सातारा, सासुर्वे कोरेगाव, शनिवार पेठ, मेढा ता. जावळी, करंजे सातारा, शेदुरजणे ता. कोरेगाव, चाफळ, कुमठे ता. खटाव आदी. अशा भागांतून कोरोना रूग्ण आढळले आहेत.