police
प्रतिकात्मक फोटो

कऱ्हाड शहर आणि तालुक्‍यात ८०, पाटण तालुक्‍यात १५ फलटण शहर आणि तालुक्‍यात १२० बाधित सापडले आहेत. खटाव तालुक्‍यात ७१, माण तालुक्‍यात २९, कोरेगाव तालुक्‍यात ५४, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथे ३२, तर उर्वरित लोणंद मध्ये १५, खंडाळ्यात ५, तर उर्वरित ठिकाणी ११ बाधित सापडले आहेत. वाई शहर आणि तालुक्‍यात ४९, महाबळेश्‍वर शहर, तालुक्‍यात ४३, जावळी तालुक्‍यात २३ सापडले आहेत.

    सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाला असून, आतापर्यंत एक अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेत पोलिस दलाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. रविवारी (दि . ०४) रात्रीच्या अहवालानुसार बाधितांच्या संख्येत ७०३ ची भर पडली असून, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून, ३०३ जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले. सातारा शहर आणि तालुक्‍यात १२९ बाधित सापडले असून, वाढणारा हा आकडा सातारकरांसाठी आगामी काळात डोकेदुखी ठरणार आहे.

     तालुकािनहाय बािधतांची संख्या
    कऱ्हाड शहर आणि तालुक्‍यात ८०, पाटण तालुक्‍यात १५ फलटण शहर आणि तालुक्‍यात १२० बाधित सापडले आहेत. खटाव तालुक्‍यात ७१, माण तालुक्‍यात २९, कोरेगाव तालुक्‍यात ५४, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथे ३२, तर उर्वरित लोणंद मध्ये १५, खंडाळ्यात ५, तर उर्वरित ठिकाणी ११ बाधित सापडले आहेत. वाई शहर आणि तालुक्‍यात ४९, महाबळेश्‍वर शहर, तालुक्‍यात ४३, जावळी तालुक्‍यात २३ सापडले आहेत. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलिस ठाण्याच्या पातळीवर आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्यावर पुन्हा एकदा भर देण्यात येत असून, पोलिसांचे कोरोना केअर सेंटर आज पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले.