election

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष सुरुवात होणार होती. मात्र, मतमोजणीला येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची मास्क, ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले.

    सातारा : कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या मतमोजनीस येथील वखार महामंडळाच्या गोदामातून आता तब्बल एक तासानंतर सुरुवात झाली आहे. सकाळी ठीक नऊ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून मतपेठ्या मतमोजणीसाठी उघडण्यात आल्या. त्यानंतर मतमोजणी कार्यालयातून ७४ टेबलवरून कर्मचाऱ्यांद्वारे दोन फेर्यात मतमोजणी सुरवात करण्यात आली. यामध्ये सुरवातीला अनुसूचित जात जमाती वर्गाची मतमोजणी केली जात आहे.

    यावेळी मतपत्रिका एकत्र न करता मतदान केंद्रानिहाय मतमोजणी सुरु असुन कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी ४७ हजार १४५ सभासदांपैकी ३४ हजार ५३२ सभासदांनी मतदान केले आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत संपुर्ण निकाल अपेक्षित आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी निवडणूकीच्या निकालाकडे कारखाना सभासदांसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहिले आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्रासह परिसरात कडक बंदोबस्त लावला असुन तपासणी करुन मतमोजणीसाठी सोडले जात आहे. पहिल्या फेरीचा निकाल साधारणतः दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

    कृष्णा कारखाना निवडणुकीत इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी दोन फेर्यात होत आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलकडून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात संस्थापक पॅनेलकडून कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांनी व रयत पॅनेलकडून डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आव्हान दिले आहे.

    कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष सुरुवात होणार होती. मात्र, मतमोजणीला येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची मास्क, ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले. यामध्ये एक अर्धा तास वेळ गेला. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी प्रतिनिधी आल्यानंतर त्यांच्या टेबलवर मतपेठ्या आणण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्याकडे त्या सोपवण्यात आल्या. मतमोजणी प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सुरुवात केली.