स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडप्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारण वाचून व्हाल थक्क

खाजगी बँकेकडून या दाम्पत्याची आर्थिक फसवणूक झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची तब्बाल ४१ लाखांची फसवणूक केी आहे. याबाबत वारंवार तक्रार दाखल करुनही कोणतीही दखळल न घेतल्याने दाम्पत्याने हा निर्णय घेतला आहे.

सातारा : देशभरात आज ७४ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा होत आहे. यातच साताऱ्यात उत्साहालाल गालबोट लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दाम्पत्याने पेट्रोल अंगावर ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला आहे. परंतु जवळील दक्ष पोलिसांनी हा अनर्थ होण्यापासून अडवला आहे. 

खाजगी बँकेकडून या दाम्पत्याची आर्थिक फसवणूक झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची तब्बाल ४१ लाखांची फसवणूक केी आहे. याबाबत वारंवार तक्रार दाखल करुनही कोणतीही दखळल न घेतल्याने दाम्पत्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनाही या तक्रारी बाबत निवेदन करुनही कोणते पाऊल उचले नाही. त्यामुळे संतापलेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दोघांनी सोबत पेट्रोलची कॅन अंगावर ओतून घेतले. पण पोलीसांनी त्यांच्या हातातील कॅन हिसकावून घेतले आणि दोघांना दूर केले. दाम्पत्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे. पोलीसांनी दाखविलेल्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी जिवितहानी टळली आहे.