प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

सातारा : सातारा शहराच्या अनेक भागात जुगार अड्डे जोमाने सुरु आहेत. भरवस्तीतच हे अड्डे सुरु असल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरही आक्षेप नोंदवले जावू लागले आहेत. सकाळी, दुपारी, रात्री अपरात्री कोणत्याही भागात अथवा आडोशाला हे जुगार अड्डे सुरु असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असणाऱ्या सातारा दूध डेअरीसमोरील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अडड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे

सातारा : सातारा शहराच्या अनेक भागात जुगार अड्डे जोमाने सुरु आहेत. भरवस्तीतच हे अड्डे सुरु असल्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरही आक्षेप नोंदवले जावू लागले आहेत. सकाळी, दुपारी, रात्री अपरात्री कोणत्याही भागात अथवा आडोशाला हे जुगार अड्डे सुरु असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असणाऱ्या सातारा दूध डेअरीसमोरील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अडड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय वाघमारे, संतोष मतकर, अमर जाधव, अक्षय जाधव, फिरोज पठाण, अक्षय जाधव, सुभाष मोरे, सुमित बनसोडे, जीवन काळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३.१५ लाखांची रोकड, जुगार साहित्य, तीन मोबाईल, तीन दुचाकी, दोन रिक्षा जप्त केल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सातारा शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्याच्या काही भागात जुगार अड्डे जोमाने सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार होणाऱ्या कारवाईनंतरही जुगारअड्डे सुरुच राहत असल्यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्याच्या कोणत्याही भागात दरररोज कुठे ना कुठेतरी जुगार अडड्ड्यावर धाड टाकून पोलीस रोकड तसेच अन्य ऐवज जप्त करत असलेतरी काहीच फरक पडलेला नाही.

सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असणाऱ्या सातारा कॅफे, सातारा दूध डेअरीसमोर असणाऱ्या एका पत्र्याच्या आडोशाला जुगार अडड्डा सुरु असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाड टाकली असता त्यांना अक्षय आराम वाघमारे (वय २४, रा. शाहूनगर, जगतापवाडी, सातारा), संतोष दिलीप मतकर (वय ३२, रा. ५१२, मंगळवार पेठ, सातारा), अमर चंद्रकांत जाधव (वय ३२, रा. शाहूपुरी, सातारा), अक्षय नंदू जाधव (वय २३, रा. करंजे पेठ, सातारा), अक्षय संजय जाधव (वय २५, रा. रविवार पेठ, सातारा), फिरोज युनूस पठाण (वय ५0, रा. सदरबझार, सातारा), सुभाष वसंत मोरे (वय ४५, रा. बेबलेवाडी, ता. जि. सातारा), सुमित परशुराम बनसोडे (वय २२, रा. म्हसवे, ता. जि. सातारा), जीवन कृष्ण काळे (वय ५२, रा. करंजे पेठ, सातारा) येथे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ३ लाख १५ हजार ८१0 रुपयांची रोकड, जुगार साहित्य, तीन मोबाईल, तीन दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केेला असून त्यांना सीआरपीसी ४१ (१) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे.