तब्बल २३ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त ; सीमा शुल्क विभागाची करवाई

केळघर येथील संतोष पार्टे याच्या फार्महाउसवर गांजा असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री फार्म हाउसवर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये एकूण २३. ६३१ किलोग्रॅम गांजा जप्त केला असून, या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे.

    सातारा: जावळी तालुक्यातील केळघर येथील एका फार्म हाउसवर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत तब्बल २३ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. संतोष पांडुरंग पार्टे (रा. केळघर (मेढा), ता. जावळी, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    केळघर येथील संतोष पार्टे याच्या फार्महाउसवर गांजा असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री फार्म हाउसवर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये एकूण २३. ६३१ किलोग्रॅम गांजा जप्त केला असून, या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी संतोष पार्टे याला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी त्याला जावळी (मेढा) न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्ती एन. एस. काळे यांनी ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    सदरची ही कारवाई पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या अखत्यारीत दापोली कस्टम विभागाचे उपआयुक्त अमित नायक एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व जवान मधुकर भोईटे यांच्या देखरेखीखाली अधीक्षक महेश कुमार यादव यांच्यासह पथकातील निरीक्षक अमर बहादूर मौर्य, मनाली शिवप्रकाश कथले, विकास, मुकेश कुमार, एस. एम. आंबेकर, एस. एस. विलंकर, के. एल. ढेबे, व्ही. के. कात्रट यांनी ही कारवाई केली.