Crime

गेले काही दिवस लसींचा तुटवडा होत असल्याने लस मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ होत आहे. मात्र, ज्यांचा वशीला त्यांनाच प्रथम लस मिळत असल्याने सर्वसामान्यांना लस मिळवणे जिकीरीचे झाल्याने याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सातारा दौऱ्यावर असताना या प्रकाराची गंभीर दखल घेत दादागिरी अथवा वशिलेबाजीने लस घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिल्या होत्या.

    सातारा : वशिलेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.

    त्यानुसार साताऱ्यातील कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर टोकन नसतानाही तेथील कर्मचाऱ्यांना दादागिरी करून लस देण्यास भाग पाडल्याप्रकरणी नगरसेविका स्मिता चंद्रशेखर घोडके, चंद्रशेखर राजाराम घोडके, पद्मावती दत्तात्रय नारकर, सुभाषचंद्र भवरीलाल हिरण, रसिला सुभाषचंद्र हिरण, दीपलक्ष्मी सचिन शालगर (सर्व रा. सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्फाफ नर्स सुजाता सुरेश साठे यांनी तक्रार दिली आहे.

    याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. २९ रोजी साताऱ्यातील राजवाडा येथे असलेल्या कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु होते. त्यावेळी वरील संशयितांनी त्यांच्याकडे लसीसाठी लागणारे टोकन नसताना कर्मचाऱ्यांना दादागिरी करून लस देण्यास भाग पाडले. याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    जिल्ह्यात गेले काही दिवस लसींचा तुटवडा होत असल्याने लस मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ होत आहे. मात्र, ज्यांचा वशीला त्यांनाच प्रथम लस मिळत असल्याने सर्वसामान्यांना लस मिळवणे जिकीरीचे झाल्याने याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सातारा दौऱ्यावर असताना या प्रकाराची गंभीर दखल घेत दादागिरी अथवा वशिलेबाजीने लस घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिल्या होत्या.