Chimurdi was looking at her mother from the third floor, bent down, suddenly lost her balance and

  • जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतागृहात पाणी साचत असल्याने तेथील स्वच्छता कर्मचारी करत होते. यावेळी त्यांना मृत अर्भक सापडले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटन उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील परिसरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

सातारा – साताऱ्यात जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृतावस्थेत अर्भक सापडल्याने रुग्णालयासह लगतच्या परिसरात खळबळ उडाली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहात अर्भक मृतावस्थेत सापडले आहे. ही घटन उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतागृहात पाणी साचत असल्याने तेथील स्वच्छता कर्मचारी करत होते. यावेळी त्यांना मृत अर्भक सापडले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटन उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील परिसरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. 

या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, २७ जुलै रोजी एक गर्भवती महिला चौथ्यांदा बाळंतपणासाठी आली होती. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती नाजूक असल्याने तिचे बाळ पोटात दगावले होते. उपचारा सुरु असताना महिला सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांची नजर चुकवून स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी तिचे मृत अर्भक स्वच्छतागृहात पडले होते. 

रुग्णालयातील सफाई कर्मचारी व व्यवस्थापनाला हे अर्भक सापडल्यानंतर संबंधित महिलेकडे देण्यात आले. यावर महिलेच्या कुटूंबाने कोणताही आक्षेप घेतला नाही आहे. तसेच याबाबत कोणतीही तक्रार केली नाही. तसेच महिलेला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.