शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिराला फळे अन् फुलांची आरास

    वावरहिरे : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणारे तीर्थक्षेञ शिखर शिंगणापुरमध्ये श्रावण उत्सवात सुरुवात झाली. शंभु महादेव मंदिर परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. मंदिर परिसरात ठिकठिकाणी फुलांच्या अन् फळाच्या आकर्षक कमानी उभारल्या. तसेच मंदिर परिसरात विद्युत रोषणाईही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

    कोरोनामुळे श्रावणी उत्साही वातावरण नाही. हर हर महादेव करणारे भाविक नसल्याने भक्तीमय वातावरण काही प्रमाणात कमी जाणवतेय. तसेच या ठिकाणी गर्दी होवू नये म्हणुन पोलिस प्रशासनाने पोलिस यंत्रणा अलर्ट केली आहे. मंदिर परिसरात गर्दी करणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शासनाने अद्याप तीर्थक्षेत्रातील मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय न झाल्याने तीर्थक्षेञाच्या ठिकिणी कलम १४४ लागू आहे. त्यामुळे याठिकाणी भाविकांची गर्दी कमी प्रमाणात दिसून येते.

    एक टन पिवळ्या झेंडूच्या फुलांची आरास

    सुमारे एक टन फुलांची आरास तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात सुमारे एक टन पिवळ्या झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच मंदिरांत फळांच्या सहाय्याने केलेल्या कमानी मंदिरातील आरासात लक्षवेधी ठरल्या. मंदिरातील विविध नक्षीदार व आकर्षक फळे व विद्युत रोषणाईने मंदिर परिसरातील केलेला कलाविष्कार लक्षवेधी ठरला.