सातारा : फेसबुकवर महिला व मुलींच्या फोटोत छेडछाड करून त्यांचे अश्लील फोटो फेसबुक व सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सातारा : फेसबुकवर महिला व मुलींच्या फोटोत छेडछाड करून त्यांचे अश्लील फोटो फेसबुक व सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
प्रवीण रेमजे असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जानेवारी २०२० मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता .या संशयित आरोपीने जानेवारी २०२० मध्ये बनावट फेसबुक अकाउंट वर एका मुलीसोबत ओळख काढली. त्याने त्या मुलीचा व्हाट्सअप मोबाईल नंबर घेतला नंतर तिच्या फेसबुक वरील फोटो चा गैरवापर करून अश्लील फोटो तयार केले आणि ते मुलीला पाठवले .तसेच बनवत फेसबुक खात्यावर ही पाठवले. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून वाई पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपीने बीड येथील दुसऱ्याच्या नावावर असलेल्या सिम कार्डाचा वापर करून बनावट फेसबुक खाते उघडले. त्याद्वारे वाशी व रत्नागिरी येथील मुली व महिलांची अशाच पद्धतीने बदनामी होईल असे कृत्य केले होते. वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे सिंहगड रोड पुणे येथील एका हॉटेलात सापडला असून या आरोपीला गजाआड केले.