राज्याचे पशुसंवर्धनमंत्री  सुनिल केदार यांना निवेदन देताना प्रा. विश्वंभर बाबर नगरसेवक विकास गोंजारी व इतर.
राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांना निवेदन देताना प्रा. विश्वंभर बाबर नगरसेवक विकास गोंजारी व इतर.

माण तालुका अंतर्गत दहिवडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद तसेच मान पंचायत समितीमधील पशुवैद्यकीयअधिकारी विस्तार याबरोबरच मोहीआणि वडजल येथील अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याचे निदर्शनाला आणून दिले. म्हसवड नगरपालिकेअंतर्गत विरकरवाडी येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर असला तरी प्रत्यक्षात कार्यान्वित नसल्याने पशुपालकांची गैरसोय होत असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले.

    म्हसवड : माण तालुका पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरण्याची मागणी सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रा विश्वंभर बाबर यांनी राज्याचे पशुसंवर्धनमंत्रीसुनील केदार यांच्याकडे केली.

    महाराष्ट्राचे पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यविकास मंत्री सुनील केदार माण तालुक्याच्या दौर्यावर आले होते. यावेळी प्रा. विश्वंभर बाबर यांनी माण तालुक्यातील पशु संवर्धन विभागातील सोयीसुविधेचा अभाव व अधिकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे या बाबी मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणल्या. याबाबतचे सविस्तर लेखी निवेदन त्यांना देण्यात आले,सदर निवेदनावर नगरसेवक विकास गोंजारी अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोखंडे युवक जिल्हा सरचिटणीस निलेश काटे यांच्या सह्या आहेत.

    माण तालुका अंतर्गत दहिवडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद तसेच मान पंचायत समितीमधील पशुवैद्यकीयअधिकारी विस्तार याबरोबरच मोहीआणि वडजल येथील अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याचे निदर्शनाला आणून दिले. म्हसवड नगरपालिकेअंतर्गत विरकरवाडी येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर असला तरी प्रत्यक्षात कार्यान्वित नसल्याने पशुपालकांची गैरसोय होत असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले. माण तालुक्यात जनावरांच्या प्रमाणात पशुवैद्यकीय दवाखान्याची वाढीव गरज असल्याचे सांगून पूर्वीचे प्रस्तावित पशुवैद्यकीय दवाखाने मंजूर करण्याची मागणी विश्वंभर बाबर यांनी केली.

    तालुक्यांतील पशुपालकांची गरज लक्षात घेऊन जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही नामदार सुनील केदार यांनी यावेळी उपस्थितांना दिली .यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव उपाध्यक्ष एम के भोसले व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.