सातारा शहरात डेंगूचा संसर्ग वाढला ; १८४ घरात आढळल्या डेंगूच्या आळ्या

सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बहुतांश नागरिकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याने सातारा पालिका व हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली आहेत. शहरात सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी आशा सेविकांच्या १३ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

    सातारा : डेंग्यू प्रतिबंधासाठी हिवताप विभागाने शहरात सर्व्हेचे काम हाती घेतले आहे. पाच दिवसात शहरातील एक हजार ३५८ घरांना भेटी देण्यात आल्या. यापैकी तब्बल १८४ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने सातारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बहुतांश नागरिकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याने सातारा पालिका व हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली आहेत. शहरात सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी आशा सेविकांच्या १३ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या भागात डेंग्यू संशयित रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागातील घरांना तातडीने भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या नोंदी घेतल्या जात आहे. तसेच डास अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्टही केल्या जात आहेत.

    पाच दिवसांत पथकाकडून शहरातील १३५८ घरांना भेटी देण्यात आल्या. यापैकी तब्बल १८४ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तसेच हिवताप विभागाच्या सर्व्हेनुसार २८ जण डेंग्यू बाधित आढळून आले असले तरी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या अधिक आहे. डेंग्यूच्या डासांची पैदास ओलसर जागेत होते. हा डास दिवसभरात सुमारे नऊ जणांना चावा घेतो. वारंवार आवाहन व प्रबोधन करूनही नागरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनं हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ अश्विनी जंगम यांनी केले आहे .