सातारा जिल्ह्यात वाढला डेंग्यूचा प्रादुर्भाव ; सातारा, कऱ्हाड, खंडाळा, पाटणमध्ये रुग्णसंख्या अधिक

हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी सातारा शहरात सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जात आहे. हिवताप विभागाचे साथरोग प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांकडून म्हणावे असे सहकार्य मिळत नाही. वारंवार आवाहन करूनही नागरिक घर व परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे.

  सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण आटोक्यात येत असताना डेंग्यू, चिकुुनगुण्या व काविळीचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुुखी पुन्हा एकदा वाढली आहे. सध्या जिल्ह्यात डेंग्यू व चिकुुनगुण्याचे मिळून ३५० हून अधिक रुग्ण आहेत. या डेंग्यूने सातारा शहर वासियांची देखील झोप उडविली आहे.

  जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र, अद्यापही संक्रमण काही कमी झालेले नाही. आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र झटत असताना आता डेंग्यू, चिकुुनगुण्या, मलेरिया, काविळ अशा साथरोगांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सातारा, कºहाड, खंडाळा, पाटण व फलटण तालुक्यात अशा रुग्णांची संख्या अधिक आहे.

  जिल्हा हिवताप विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी सातारा शहरात सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जात आहे. हिवताप विभागाचे साथरोग प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांकडून म्हणावे असे सहकार्य मिळत नाही. वारंवार आवाहन करूनही नागरिक घर व परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व डेंग्यू रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे.

  काय आहेत लक्षणे…
  डेंग्यू : डेंग्यू झालेल्या रुग्णाला सांधेदुखीचा अधिक त्रास होतो. घसा दुखतो. रुग्णाला ताप येतो व डोकेदुखीचा त्रास होतो. दोन ते सात दिवसांपार्यंत रुग्णाला हा त्रास जाणवू शकतो.
  चिकनगुनिया : रुग्णाला अधिक अशक्तपणा येतो. हळूहळू सांधेदुखीचा त्रास वाढतो. डोळ्यांमध्ये जळजळ वाढते. तीव्र डोकेदुखी अशी चिकुनगुण्याची लक्षणे आहेत.
  काविळ : उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणे ही काविळीची लक्षणं आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिन्यात हा आजाराची लक्षणं कायम राहतात.

  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
  डेंग्यू २५८
  चिकनगुनिया १३२
  कावीळ ४४