विकासातूून कुरणवाडीचा बदलणार चेहरामाेहरा : सरपंच उमेश आटपाडकर

  सातारा : माण तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव म्हणून कुरणवाडीची ओळख आहे. साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच होण्याचा पहिला बहुमान आपल्याला मिळाला. सरपंचपदाची माळ गळ्यात पडताच विकासकामांना सुरूवात केली. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्वाखाली सुरु केलेले काम अविरतपणे सुरु आहे. विकासकामातून गावचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचा मनाेदय कुरणवाडीने सरपंच उमेश आटपाडकर यांनी व्यक्त केला.

  गावात अशी केली विकासकामे

  गावात ४ सिमेंटचे साखळी बंधारे उभारले. स्मशानभूमीची डागडुजी करुन स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण केले आहे. गावात ६ हातपंप बसवले असून ३ ठिकाणी सभामंडप उभारले आहेत. संपूर्ण गावात हायमास्ट (दिवे) बसवले तर वाड्या वस्त्यावरील सर्व विद्युत खांबावर बल्ब लावून गावचा अंधार दूर केला आहे. गावातील झिरपताल ते बाबा खांडेकर घर या रस्त्याचे मुरमीकरण, बाबा खांडेकर घर ते दत्त मंदिर रस्त्याचे मुरमीकरण केले आहे.

  गावात अनेक ठिकाणी मुरमीकरणाचे रस्ते तयार केले असून गावातील धुळोबा मंदिरा समोर प्लेव्हर बॉक्स बसवून मंदिरास रंगरंगोटी केली आहे. गावातील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा डिजिटल बनवली आहे, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वरकुटे- मलवडी ते कुरणवाडीपर्यंतचा  (सातारा पाटी) जवळपास साडेपाच कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण केले, असे सरपंच आटपाडकर यांनी सांिगतले.

  स्वखर्चातून बंधारे भरुन गाव टँकरमुक्त

  आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपला गाव स्वावलंबी बनविणाऱ्या कामासाठी उपयाेग केला. गावात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे करीत आहे. अापण गावात ध्वजारोहणाचा नवीन पायंडा पाडला असून प्रत्येकवेळी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान हा गावातील माजी सैनिक, ज्येेष्ठ नागरीक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, उपसपंच व सदस्य यांना देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

  गावच्या विकासासाठी स्वखर्चातून कामे केली आहेत. गावालगत असलेल्या पडळकर तलावातून गावातील सर्व बंधारे स्वखर्चातून भरुन घेतले आहेत. त्यामुळे गाव टँकरमुक्त झाले. स्वत:च्या विहीरीतून गावाला पाणीपुरवठा करीत आहे. गावात ग्रामपंचायतीची स्वतंत्र अशी पाणी योजना नसताना देखील गाव टँकरमुक्त झाले, असे सरपंच आटपाडकर यांनी नुमद केले.

  दलितवस्तीमध्येही अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिक्षणात आपला गाव मागे राहू नये, याकरीता गावात नवीन अभ्यासिका सुरु करण्यात येणार अाहे. गावासाठी व्यायायशाळा, सिमेंट बंधारे, ग्रामपंचायत इमारत, सामाजिक सभागृह, सभामंडप व विजेपासून वंचित असणाऱ्या घरात विज पोहचवण्याचे काम अागामी काळात केले जाणार अाहे. ग्रामस्थांना निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येईल.

  – उमेश आटपाडकर, सरपंच

  (शब्दांकन : महेश कांबळे, म्हसवड)