उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले. “कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो. माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे असे राजे म्हणाले.
सातारा : भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. यावर उदयनराजेंनी आपल्या खास स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले. “कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो. माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे असे राजे म्हणाले.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांना स्थानि मिळणार असून यात उदयनराजेंचाही समावेश होणार असल्याची चर्चा आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र, खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंह यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या किल्ल्याला सुरुंग लागले आहे.