ऍड. बाळासाहेब बागवान प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक किटचे वाटप

    लोणंद/प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील गोरगरीब गरजू कुटुंबांना स्वर्गीय लोकनेते ऍड. बाळासाहेब बागवान प्रतिष्ठानच्या वतीने अन्नधान्याच्या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात  आले. लोणंद येथील गणेश मंदिरात घेतलेल्या या कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचे सर्वजण उपस्थित राहिले होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार, आचार, कार्याची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचे सर्वानुमते ठरले.

    दत्ता खरात म्हणाले, संकटाच्या काळात कष्टकरी, गोरगरीब लोकांना सदैव मदतीचा हात पुढे करणारे बाळासाहेब हे खरोखर माणसामधील देव होते. त्यांचे हे कार्य सर्वांनी सुरूच ठेवायचे असे ठरवून या कोविडच्या दुसऱ्या लाटेत गोरगरीब लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्याचे ठरले. अनेकांनी यात मदतीचा मोठा सहभाग नोंदविला. सर्फराज बागवान यावेळी म्हणाले, आमचे संपूर्ण कुटुंब अजूनही वडिलांच्या आकस्मित निधनामुळे सावरलेले नाही. तरीसुद्धा आज लॉकडाऊन असल्याने अनेकांची उपजीविका भागविणे कामधंदे बंद असल्याने अवघड झाले आहे. याचवेळी अशा अडचणीच्या वेळी वडील शांत बसत नव्हते. तर सर्वांना बरोबर घेऊन मदत करत होते.

    आजही आम्ही सर्वजण एकत्र येऊन लोणंदमधील सर्व गरीब गरजू कुटुंबांना ५०० जीवनावश्यक किटचे वाटप करणार आहोत. पुढेही ५०० किट वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ऍडव्होकेट विलायत मणेर, शशिकांत जाधव, नगरसेविका शैलजा खरात, शाम डोईफोडे, दादासाहेब शेळके, अमोल शेळ्के आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

    यावेळी नगरसेविका खरात, सरफराज बागवान, राजेंद्र डोईफोडे, शरद भंडलकर, उमेश खरात, दत्तात्रय खरात, इम्रानभाई बागवान, साजिद बागवान, मस्कूअण्णा शेळके, ओंकार कर्णवर, ऍड. हेमंत खरात, रमेश कर्णवर उपस्थित होते. लोणंद येथील रुग्णांना सहकार्य केल्याबद्दल जम्बो हॉस्पिटल साताराचे इनचार्ज लोणंदचे सुपुत्र दबडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारीक बागवान यांनी केले.