जिल्हा बँकेला तिसरा पर्याय देणार : धनंजय चव्हाण

आजपर्यंत जिल्हा बँक ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. ठराविक लोकांना जवळ धरून बँकेची निवडणूक पार पाडली जात होती. मात्र आता सर्वसामान्य मतदारांमध्ये चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी बँकेला उमेदवारी करण्यासंदर्भात आपणास आग्रह केला आहे. पक्ष संघटना व आपल्या वैयक्तीक संपर्कातील २५ ते ३० मते आहेत. सदयस्थितीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील पक्षांतर्गत नाराजी व मत विभागणीचा फायदा घेत आपण विजयी होऊ शकतो असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    वडूज : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विकास सोसायटी मतदार संघातून खटाव तालुक्यात तिसरा पर्याय
    देणार असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. वडूज येथे झालेल्या पत्रकार परिषदेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदिप शेटे, सोसायटीचे उपाध्यक्ष मोहनराव बागल, तंटामुक्तीचे अध्यक्ष हणमंत इनामदार, ग्रा. पं. सदस्य किरण चव्हाण, धनाजी चव्हाण,कातरखटाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबे, विकास बरकडे, विवेक इनामदार आदी उपस्थित होते.

    चव्हाण म्हणाले, आजपर्यंत जिल्हा बँक ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. ठराविक लोकांना जवळ धरून बँकेची निवडणूक पार पाडली जात होती. मात्र आता सर्वसामान्य मतदारांमध्ये चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी बँकेला उमेदवारी करण्यासंदर्भात आपणास आग्रह केला आहे. पक्ष संघटना व आपल्या वैयक्तीक संपर्कातील २५ ते ३० मते आहेत. सदयस्थितीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील पक्षांतर्गत नाराजी व मत विभागणीचा फायदा घेत आपण विजयी होऊ शकतो असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    जिल्हा पातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली चालल्या आहेत त्यावेळी आपली भूमिका काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर चव्हाण म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत खटाव माण ची निवडणूक बिनविरोध होणार नाही. तसेच समोर कोणीही मातब्बर उमेदवार असला तरी आपण निवडणूकीतून हटणार नाही. साटेलोटे व दबावाच्या राजकारणालाही आपण भिक घालणार नसल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.