ajit pawar

त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय माहीत? पण इतर पक्षात गेला की चौकशी सुरू होते, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केली. पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वाई शहरामध्ये सोमवारी त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि कोविड योध्याचा सन्मान केला. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजपावर सडकून टीका केली.

    सातारा : त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय माहीत? पण इतर पक्षात गेला की चौकशी सुरू होते, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केली. पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वाई शहरामध्ये सोमवारी त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि कोविड योध्याचा सन्मान केला. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजपावर सडकून टीका केली.

    मी कधीच चुकीचे करा असे सांगणार नाही. मी कधी चुकीचे समर्थन करणार नाही. पण काही जण कारण नसताना लोकांची बदनामी करत असतात. लोकांना खोटे सांगितले जात, सारखे खोटे सांगत राहिला की लोकांनी खरे वाटायला लागते, असा दुर्दैवी प्रकार राज्याच्या राजकारणात सुरू आहे, असे पवार म्हणाले.

    जरंडेश्‍‍वर सहकारी साखर कारखान्‍यातील कारभारावरून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी केलेल्या गंभीर आरोपांवरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. जरंडेश्‍‍वर कारखान्याबाबत मला काहीही बोलायचे नाही. जे असेल ते नियमाप्रमाणे होईल. संपूर्ण राज्‍याला माहीत आहे की मी नियमाप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे काही लोक माझ्‍याबाबत बोलतात, मला असल्‍या लोकांनाही उत्तर द्यायचे नाही, असे ते म्हणाले.

    त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय माहीत? त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात असला की त्याची चौकशी लागते. बऱ्याच जणांची चौकशी लागलेली आहे, ते तिकडे गेले आणि काहींना आमदारकी मिळाली, काहींना मंत्रिपदे मिळाली. त्यांच्यावर लागलेली चौकशीसुद्धा बंद झाली. हे राजकारण न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही, सूज्ञ आहे त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात.

    - अजित पवार, उपमुख्यमंत्री