डॉ. बाबा आढाव, हसमुख रावल यांना आबासाहेब वीर पुरस्कार प्रदान

आयुष्यभर उपेक्षितांसाठी काम करताना त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो, याचा आनंद आहे. मात्र त्याच विश्वासाला जर पात्र राहता आले नाही तर काय ? याचीही चिंता कायम राहिली. सध्या भलत्याच प्रश्नांना दिलेले जाणारे महत्व कळीच्या मुद्यांना झाकोळून टाकत आहेत. लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांना दुय्यम ठरवलं जात आहे. यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करणे, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं बनलं आहे. त्यातूनच नविन क्रांती जन्माला येईल.

  वाई : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त पुणे येथे साधेपणाने झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात भुईज, ता. वाई येथील किसन वीर कारखान्याच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि आरटीपीसीआर किटचे निर्माते हसमुख रावल यांना आबासाहेब वीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  गुलटेकडी येथील हमाल भवनात झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, अभय छाजेड, उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने, डॉ. अभिजित वेद्य, संजय बालगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक लाख रुपये, सन्मानपत्र, फुले पगड़ी, फुले उपरणे, शाल, पुष्पहार देवून डॉ. आढाव आणि त्यांच्या पत्नी शीलाआढाव यांचा सन्मान करण्यात आला.

  यावेळी बोलताना डॉ. आढाव म्हणाले, आयुष्यभर उपेक्षितांसाठी काम करताना त्यांच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो, याचा आनंद आहे. मात्र त्याच विश्वासाला जर पात्र राहता आले नाही तर काय ? याचीही चिंता कायम राहिली. सध्या भलत्याच प्रश्नांना दिलेले जाणारे महत्व कळीच्या मुद्यांना झाकोळून टाकत आहेत. लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांना दुय्यम ठरवलं जात आहे. यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करणे, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं बनलं आहे. त्यातूनच नविन क्रांती जन्माला येईल. आबासाहेब वीर यांनी ज्या धाडसाने स्वातंत्र्यपूर्व काळात योगदान दिलं त्याच तडफेने त्यांनी कृषि औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार हा आनंद देणारा आहे. असेही डॉ. आढाव यांनी सांगून पुरस्काराची रक्कम शेतकरी, पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले.

  उल्हास पवार म्हणाले, देव न मानणारा देवमाणूस असं बाळासाहेब भारदे यांनी बाबांचं वर्णन केलं. बाबा फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार अक्षरशः जगले आहेत. कष्टकन्यांसाठी लढा देताना तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दको पात कधीय आला नाही. त्यासाठी प्रसंगी समोर कोण आहे हेही न पाहता आंदोलने केली. आबासाहेब वीरांनी स्वातंत्र्यवेदीवर स्वतःला पणाला लावले. थक्क व्हावे अशा अनेक प्रसंगांनी त्यांचे आयुष्य भरलेले आहे.

  मदन भोसले म्हणाले, आबासाहेब वीर यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम केला. संपूर्ण सात्यांनी संस्थात्मक आणि संघटनात्मक कामाची भक्कम पायाभरणी केली. कोणत्याही पदाचा यत्किंचित मोह बाळगला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा स्नेह मैत्रीचा मापदंड ठरला. आबासाहेब वीर है एक अजब रसायन होतं. त्याचपद्धतीने उभी हयात कष्टकऱ्यांसाठी अर्पण करणारे डॉ. आढाव हेही एक अजब रसायनच आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना प्रदान करताना विशेष समाधान आहे. गजानन बाबर म्हणाले, मी वेगळ्या विचारधारेत काम करणारा असलो तरी डॉ. बाबा आढाव यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेवून माझे आंदोलनात्मक काम उभे केले.तेच काम मला संसदेत घेवून गेले.

  दरम्यान, बाणेर येथील मायलॅबच्या कार्यालयात हसमुख रावल यांना सन्मानपत्र, पन्नास हजार रुपये, शाल , श्रीफळ, पुष्पहार देवून आबासाहेब पर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मदन भोसले म्हणाले, आबासाहेब वीर यांचे कार्य स्मृती चिरंतन रहावे या हेतूने वर्षापूर्वी पुरस्कार सुरु झाले. सहा वर्षांपूर्वी कर्तबगार युवकांसाठी प्रेरणा पुरस्कार सुरु केला. मायलंब कंपनीचे संस्थापक हसमुख रावल यांनी जैव तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले काम अचंबित करणार आहे. देशातील पहिल्या आरटीपीसीआर चाचणी किटची निर्मिती करुन देशातील पाच करोड जनतेपर्यंत ते पोहोचवलं. जगातील ३० देशात त्यांची १०० उत्पादनं जगभर पोहोचली आहेत. प्रेरणा पुरस्काराने जगाच्या आरोग्याची चिंता वाहणाऱ्या तरुणाचा सन्मान केल्याचा आनंद आहे. हसमुख रावल म्हणाले, किसन वीर परिवाराने केलेला हा सन्मान पुढील दहा वर्षांसाठी मिळाली आहे. विका मायलंयने केलेले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संशोधन प्रयत्न केले. कोविडपेक्षाही देशाला मोठा धोका आहे. सो क्षयरोगाचा. त्यामुळे क्षयरोग निर्मूलनासाठी पावलव विशेष प्रयत्नशील असून त्यादृष्टीने संशोधन सुरु आहे. मापलबचे काम जगभर पोहोचत असले तरी या सर्व कामापाठी संपूर्ण टिपचे योगदान आहे. या टिमचे नेतृत्व जरी माझ्याकडे असले तरी सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. याच एकीच्या बळावर मायलेबने आजपर्यंत केलेले काम या पुरस्काराच्या प्रेरणेने अधिक ताकदीने यापुढेही करु.

  या दोन्ही कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक सीए. सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, राहुल घाडगे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, सेक्रेटरी एन. एन. काळोखे, निवड समितीचे सदस्य अनिल जोशी, प्रा. रमेश डुबल, गुरुप्रसाद सारडा, अँड. जयवंतराव केंजळे, अँड. नंदकुमार येवलेकर, पायलॅबचे संचालक देवर्षि दे, मोहित अग्रवाल, किशोर बाबर, मेहबुब मदारखान, आनंद जाधवराव आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संचालक नंदकुमार निकम यांनी केले, स्नेहल दामले यांनी मानपत्रांचे वाचन केले. नितीन पवार व हृषिकेश भोसले यांनी आभार मानले.

  आस्वाद कष्टाच्या भाकरीचा
  पुरस्कार प्रदान कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव म्हणाले, माझे वय १२ आहे असे का सारखे सारखे म्हणता ? माझा उत्साह २९ चाच आहे. त्यामुळे माझे वय २९ आहे असे म्हणा, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हा कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. आढाव यांनी सर्वांना कष्टाची भाकर खाऊ घातली व सर्वांनी त्याचा भवानी पेठेतील छोट्याच्या कष्टाच्या भाकरीचा आनंदाने आस्वाद घेतला.