सत्कारामुळे चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळते : डॉ. महेश गुरव

    कातरखटाव/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती, संस्थेचा गौरव, सत्कार झाल्यास त्यापासून इतर लोकांना तसेच सत्कारमुर्तीला चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळते, असे मत काँग्रेसचे माण मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव यांनी केले.

    वडूज येथील बाजार समितीच्या सभागृहात खटाव तालुका सोशल फौंडेशन, येरळा परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या नुतन अधिकारी, गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे, संजय गांधी निराधारचे माजी अध्यक्ष विजय शिंदे, वीज कामगार इंटकचे विभागीय सचिव संतोष शिंदे, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष अनिल उमापे, प्रा. दिलीप भुजबळ, सोमनाथ साठे, दाऊद मुल्ला, इम्रान बागवान, समीर तांबोळी विठ्ठल नलवडे, शरद कदम, , सचिन साठे, सर्वगोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

    डॉ. गुरव म्हणाले, बाजार समितीचे सचिव हणमंतराव मदने, उपसचिव अशोकराव पवार यांनी लेखनिक पदावर कामाची सुरुवात करुन आजपर्यंत चांगले काम केले आहे. संस्थेच्या भरभराटीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिध्दान्त चिंचकर, आशिष शिंदे या दोघांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

    यावेळी मदने, शिंदे, जे. के. काळे यांची मनोगते झाली. येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी स्वागत केले. आयाज मुल्ला यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. शरद कदम यांनी आभार मानले.