डॉ. थत्ते यांनी मेढाचे नाव परराज्यात पोहोचवले : कांतीभाई देशमुख

    केळघर : मेढा नगरीत गेले सत्तर वर्षे दिवस दुबळ्या गरीब व डोंगराळ भागातील जनतेला आरोग्य सेवा देणारे मेढा नगरीचे भूषण डॉ. वा. सी. थत्ते (नाना) यांनी मेढाच नव्हेतर जावलीचे नाव आपल्या सेवेने राज्यातच नव्हे तर परराज्यात पोहोचवले आहे. त्यांच्या जाण्याने मेढा नगरीबरोबरच वैद्यकिय क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे उद्गार जावली पंचायत समितीचे माजी सभापती कांतीभाई ऊर्फ चंद्रकांत देशमुख यांनी काढले.

    म. गांधी वाचनालयाचे संस्थापक व जावली तील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. वा. सी. थत्ते यांचे वयाच्या ९ ६ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वाचनालयाच्या स्व. विजयाताई थत्ते सभागृहात शोकसभेचे आयोजन केले होते . त्या प्रसंगी देशमुख बोलत होते.

    याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष दत्ताआण्णा पवार, तुकाराम धनावडे , डॉ. संपतराव कांबळे ,नगरसेवक विकास देशपांडे, देशमुख गुरुजी, यांनी .डॉ. थत्ते यांच्या वैद्यकिय , सामाजीक तसेच राजकिय , ग्रंथालयीन कामकाजाचे अनुभव व्यथीत करून ‘ भावनाविवश होवून त्यांना आदरांजली अर्पण केली. तर वाचनालयाचे अध्यक्ष , पत्रकार सुरेश पार्टे यांनी डॉ थत्ते यांनी संस्था स्थापनेपासून आजपर्यंत दिलेल्या पाठबळामुळेच वाचनालय आज तालुका ” अ ” वर्गापर्यंत पोहोचले आहे. वाचनालय हे त्यांच दुसरे कुटुंब होते असे सूचित केले.

    या शोकसभेला माजी सरपंच बबनराव वारागडे , ऍड राजेंद्र वीर, सुनिल काशिलकर, डॉ सुहास कांबळे, डॉ. प्रिया कांबळे, यमुना वारागडे, आनंदी करंजेकर, कोरोना योध्दा किसन साळुंखे, उदय कारंजकर , उदय पंडित, सुशांत कांबळे,विनय थत्ते,  सुभांगी थत्ते,कार्याध्यक्ष  शोभा शेडगे, सचिव धनंजय पवार, संचालक डॉ अशोक दिक्षित , विठ्ठल देशपांडे ,ग्रंथपाल महादेव जंगम, सहा ग्रंथपाल सौ आशा मगरे, लिपिक इमताज शेख, माधवी कदम,  इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रतीमा पुजन करून उपस्थितांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष पञकार सुरेश पार्टे यांनी केले तर आभार संचालक विठ्ठल देशपांडे यांनी मानले.