सातारा जिल्हा बँकेची प्रारूप यादी अखेर प्रसिद्ध

१९६३ मतदारांचा यादीत समावेश बँकिंग रेग्युलेशन अॅक्टचा जिल्हा बँक निवडणुकीला अडथळा? केंद्राच्या नवीन कायद्याची होणार संचालकांना अडचण

  सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण रंगात येत असताना प्रशासकीय तयारीने सुध्दा गती पकडली आहे . बँकेच्या एकवीस संचालकांना मतदान करणाऱ्या १९६३ मतदारांची प्रारूप यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली .

  या प्रारूप यादीवर हरकती व आक्षेप १३ सप्टेंबर पर्यंत दोन प्रतीत सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर येथे सादर करावयाचे आहेत . मतदारांची प्रारूप यादी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालय सातारा, सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक कार्यालय सातारा येथे प्रसिध्द करण्यात आली आहे .

  अंतिम मतदार यादी ही २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणार असून दाखल होणाऱ्या हरकतींची सुनावणी घेऊन त्यावर २२ सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावयाचे आहेत .विभागीय सहनिबंधक प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत .

  कच्ची मतदार यादी पुढील प्रमाणे –

  १ . सोसायटी मतदारसंघ -९५७

  २. खरेदी विक्री संघ-११

  ३. कृषी प्रक्रिया सहकार संस्था -२७

  ४. नागरी बँक व पतसंस्था -३७४

  ५. गृहनिर्माण व दूध संस्था -२७२

  ६. औद्योगिक व मजूर संस्था -३२२