कोरोना काळात सर्व रुग्णालयात अधिकृत बिलाशिवाय बिल भरु नये ; प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या सूचना

फलटण येथील निकोप हॉस्पिटल, सुविधा हास्पिटल, स्पंदन केअर हास्पिटल, श्री साई हॉस्पिटल, सिध्दनाथ हास्पिटल, जीवनज्योती हॉस्पिटल व सिध्दीविनायक हॉस्पिटलसह फलटण तालुक्‍यातील सर्व कोरोनांवर उपचार करणार्या हॉस्पिटलला शासन नियमानुसार सर्व हास्पिटलमध्ये कोरोना उपचाराबाबतचे दरपत्रक हे दर्शनी भागांवर लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी आदेशात नमूद केलेले आहे.

    फलटण : सध्या फलटण शहरासह तालुक्‍यातील सर्वच भागामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. कोरोना काळामध्ये खाजगी हास्पिटलमध्ये बर्यापैकी रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्णांचे उपचार झाल्यानंतर हॉस्पिटलकडून अधिकृत बिल न देता शासनाच्या नियमापेक्षा जादा बिलाची आकारणी ही हास्पिटल कडून होत असल्याची तक्रारी वारंवार येत आहेत. म्हणूनच कोरोनाबाधित रूग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलकडून अधिकृत बिल मिळाल्याशिवाय बिलाचा भरणा करू नये व हॉस्पिटल प्रशासनाने सुध्दा अधिकृत बिल न देता बिलाचा भरणा करून घेवू नये, असे आदेश फलटणचे प्रांताधिकारी तथा डॉ. शिवाजी जगताप यांनी पारित केलेले आहेत.