मोठी बातमी ! ‘ईडी’ची जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस; जरंडेश्वरच्या ८० कोटींच्या कर्ज प्रकरणी मागविला खुलासा

    सातारा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज पुरवठा कसा केला याची माहिती तातडीने सादर करा, अशी नोटीस ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला बजावली आहे. ईडीच्या नोटिसीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    ईडीने नुकताच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. कारखान्यांशी सबंधित असणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे. या ज्यांनी जरंडेश्वर कारखाना लिलावात घेतला त्यांना चार बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यात सातारा जिल्हा बँकेनेही 96 कोटींचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. हा कर्जपुरवठा नेमका कसा केला.

    याची माहिती ईडीने मागवली आहे. देशभरात नावाजलेल्या जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्याने राज्याच्या सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.