सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस; कर्जपुरवठ्यात अनियमितता प्रकरण

जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्जपुरवठा करणारी सातारा जिल्हा बँकही ईडीच्या रडारवर आली आहे. बँकेलाही ईडीने नोटिस बजावली असून कर्ज पुरवठा कोणत्या आधारावर केला, त्याची परतफेड नियमित होतेय का?, याची माहिती मागितली आहे. नुकतीच कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर खळबळ उडाली होती.

    सातारा : जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्जपुरवठा करणारी सातारा जिल्हा बँकही ईडीच्या रडारवर आली आहे. बँकेलाही ईडीने नोटिस बजावली असून कर्ज पुरवठा कोणत्या आधारावर केला, त्याची परतफेड नियमित होतेय का?, याची माहिती मागितली आहे. नुकतीच कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर खळबळ उडाली होती. ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करून कारवाई मागे घेण्याची मागणी केली. तसेच कारखाना सुरू ठेवण्याची मागणीही केली.

    आरबीआय व नाबार्डच्या धोरणानुसारच कर्जपुरवठा

    ईडीच्या नोटिसीनंतर बँक संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. ज्यावेळी हा कर्जपुरवठा केला त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष होते. दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेने जिल्ह्यातील विविध कारखान्यांना कर्जपुरवठा केला असल्याची माहिती दिली. हा कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला आहे. यासोबतच दरम्यान, कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला असून त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत असल्याने आम्ही ईडीच्या नोटिशीला उत्तर देऊ, असे ते म्हणाले.