शरीर सुखाची मागणी करणारा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ अखेरीस निलंबित

सातारा जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला वारंवार त्रास देऊन तिच्या असह्ययतेचा गैरफायदा घेत गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याने तिच्या शाळेवर सतत भेटी दिल्या होत्या. शाळा तपासणीच्या नावाखाली रिकाम्या वर्गात नेऊन त्या शिक्षिकेकडे पहात तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या शिक्षिकेला कारवाईची भीती दाखवून शरीर सुखाची मागणी धुमाळ याने केली.

    सातारा : महिला शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्यानंतर तिने केलेल्या तक्रारीनुसार धुमाळ यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांना अटक ही करण्यात आली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. दरम्यान, त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांनी पुन्हा रजा घेतली होती. गुरुवारी मात्र, त्यांना जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निलंबीत केले.

    सातारा जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला वारंवार त्रास देऊन तिच्या असह्ययतेचा गैरफायदा घेत गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याने तिच्या शाळेवर सतत भेटी दिल्या होत्या. शाळा तपासणीच्या नावाखाली रिकाम्या वर्गात नेऊन त्या शिक्षिकेकडे पहात तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या शिक्षिकेला कारवाईची भीती दाखवून शरीर सुखाची मागणी धुमाळ याने केली. त्यावरून शिक्षिकेने अगोदर जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दि. १४ जूनला तालुका विशाखा समितीला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तालुका पंचायत समितीच्या विशाखा समितीकडून हालचाल न झाल्याने त्या पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित चौधरी यांनी तपास करून धुमाळ यास अटक केली होती. न्यायालयाने जामीनावर सोडताच पोलिसांच्या अहवालानुसार त्यास जिल्हा परिषदेने सक्तीच्या रजेवर दि.१५ जुलैपर्यत पाठवले होते. मात्र, धुमाळ यास कोरोनाची बाधा झाल्याचे कारण देत पुन्हा रजा मागवून घेतली होती. दरम्यान, याबाबत अनेक संघटनांनी धुमाळ यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.