“ये जो पब्लिक है सब जानती है” ; शिवेंद्रसिंहराजे यांचा उदयनराजे यांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंभर बेड हॉस्पिटलची घोषणा सातारा दौऱ्यात केली होती . या हॉस्पिटल्ससाठी जुना दवाखाना ( शाही मशिद ) येथे उभारणी करावी असे निवेदन शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले . याची माहिती देण्याच्या निमित्ताने संवाद साधणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली .

    सातारा : सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात विकास कामांचे जे नारळं फुटत आहेत आणि त्या निमित्ताने जी फ्लेक्स बाजी होत आहे , त्या खर्चातून सातारा शहरातील एखाद्या गटाराचे किंवा रस्त्याचे काम झाले असते . बोगस बिले, मर्जीतले ठेकेदार, आणि विकासकामे मात्र काहीच नाही सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात बहुमताच्या जोरावर केवळ नौटंकी केली . काही लोक रस्त्यावर बाईक चालवतात त्यापेक्षा पाच वर्ष पालिका नीट चालविली असती तर बरे झाले असते असा घणाघाती टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांना त्यांचे नाव न घेता लगाविला .

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंभर बेड हॉस्पिटलची घोषणा सातारा दौऱ्यात केली होती . या हॉस्पिटल्ससाठी जुना दवाखाना ( शाही मशिद ) येथे उभारणी करावी असे निवेदन शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले . याची माहिती देण्याच्या निमित्ताने संवाद साधणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली . शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, काही लोक विकास कामांच्या उद्घाटनांसाठी दुचाकीवरून गेल्याचे समजले, विकास कामांच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी केवळ नौटंकी केली . दुचाकी चालविण्यापेक्षा पाच वर्ष सातारा पालिका व्यवस्थित चालविली असती तर बरे झाले असते . आता सातारा पालिकेची निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी सातारकरांना भुलविण्याचे उद्योग सुरु झाले आहेत . दुसऱ्यांच्या कामांवर जाऊन फोटोसेशनं करायचे आणि सगळी कामे आम्हीच केले असे सांगायचे ही प्रवृत्ती सातारकरांना ज्ञात आहे, ये जो पब्लिक है वो सब जान ती हे, लोक काय म्हणतील ते यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना समजाणारच आहे .. पालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्ष बहुमताच्या जोरांवर प्रचंड बेकायदेशीर कामे केली या कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी खोलात जाऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली .विद्यमान नगराध्यक्षांचे शिवेंद्रसिंहराजे यांनी विशेष अभिनंदन केले . त्यांच्या पत्रिकेतील ग्रह चांगले आहेत त्यांना मागील नगराध्यक्षांप्रमाणे नशीब रजेवर नाही पाठविले असा टोला त्यांनी लगाविला साताऱ्याचा ग्रेड सेपरेटर हा साताऱ्यातील प्रेक्षणीय स्थळं म्हणून जाहीर करा अशी उपरोधिक मागणी सुध्दा त्यांनी केली .

    जिल्हा बँकेत रामराजेच निर्णय घेणार

    जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर कोणाची वर्णी लावायची यादृष्टीने आमदार शिवेंद्रसिंहराजे चर्चेत आहेत . त्या दृष्टीने त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन आम्ही पाच वर्ष सक्षमपणे बँक चालविली . केवळ संचालक म्हणून निवडून येण्यात अर्थ नाही त्यांचा उपयोग बँकेला व्हायला हवा . उदयनराजे यांना बँकेच्या संचालक मंडळावर संधी मिळणार का ? तडजोडीसाठी उदयनराजे यांचा प्रस्ताव आला तर काय ? या प्रश्नांवर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले अंतिम चर्चेचे अधिकार राम राजेंचे असून सर्व निर्णय एकत्र बसून चर्चेने होतात त्यामुळे त्यावर मी आत्ताच भाष्यं करणार नाही . आणि चर्चेसाठी उदयनराजे यांचा मला कोणताही फोन आला नाही, आणि येईल अशी सध्या परिस्थिती नाही या उत्तरामध्येच शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व स्थिती स्पष्ट करून टाकली.