Excitement in Satara; Six students of Sevagiri Vidyalaya in Pusegaon contracted corona

पुसेगावच्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली.

    सातारा : पुसेगावच्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली.

    सेवागिरी शाळा बंद करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. एका विद्यार्थामुळे हा कोरोनाचा प्रसार झाला आहे. सर्व विद्यार्थांचे पालक भयभीत झाले आहेत.

    अनलॉक नंतर जानेवारी महिन्यात राज्यील अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या. मात्र, आता पून्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. यामुळे चिंतेत भर पडली असून अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.