खासदार उदयनराजे भोसले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार उदयनराजे भोसले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा (Satara). राज्यात सध्या दिशाहिन वातावरण असून ज्यांनी आपल्याला मतदान केले, त्या मतदारांची ससेहोलपट होत आहे. हे थांबिण्यासाठी राज्याची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी ताब्यात घ्यावीत, अशा शुभेच्छा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या. ते विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबरोबर साताऱ्यात पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

तसेच निवडणूकीत भाजपला बहुमत मिळूनही फक्त राजकारणामुळे सत्ता मिळाली नसल्याचे उदयनराजे म्हणाले. स्वार्थासाठी जे लोक एकत्र येतात तेव्हा निर्णायक निर्णय होत नाही. अशीच काही अवस्था आजच्या महाविकास आघाडी सरकारची असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सरकार कोणाचेही असू द्या स्थिरता असेल तरच शासन करू शकतो, असेही ते म्हणाले.

ज्यावेळी एकत्र ठेवण्याकरिता कुठलेही प्रकारच्या ताकदीचा उपयोग करवा लागत नाही, कोणत्याही आमिषाचा उपयोग करवा लागत नाही कारण ते उद्धिष्ठासाठी, लोक कल्याणासाठी एकत्र आलेले असतात आणि असेच लोक राज्याला स्थिर सरकार देत असतात. अशाच स्थिर सरकारची अपेक्षा राज्यातील लोकांनाची आहे. त्यामुळेच मला खात्री आहे लवकरच राज्यात काही चांगले घडेल. तसेच पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून भाजपवर केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, मी, कोण काय बोलतो याचे उत्तर द्यायला बांधिल नाही. हो काही सवाल-जवाबचा कार्यक्रम नाही म्हणत विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली.