अखेर कृष्णा कारखान्याचा बिगुल वाजला

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिंबधक प्रकाश आष्टेकर यांची यापूर्वी नियुक्ती झाली आहे. कराडचे उपनिबंध मनोहर माळी, कोरोगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून काम पाहणार आहेत

    कराड : पश्चिम महाराष्ट्रचे लक्ष लागून राहिलेल्या व सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या  पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम  आज (सोमवार) सायंकाळी जाहीर झाला. कारखान्यासाठी उद्यापासून (मंगळवारपासून)अर्ज भरण्यास सुरूवात आहे. कारखान्याचे २९ जूनला मतदान तर एक जुलैला मतमोजणी होईल.

    निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिंबधक प्रकाश आष्टेकर यांची यापूर्वी नियुक्ती झाली आहे. कराडचे उपनिबंध मनोहर माळी, कोरोगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी कृष्णाच्या निवडणुक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला होता. त्याला आज सायंकाळी मंजूरी मिळाली आहे.

    त्यामध्ये मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज भरण्यास परवानगी आहे. त्यामुळे उद्याचा मंगळवार, त्यानंतर गुरूवार, शुक्रवार व पुढचा सोमवार व मंगळवार असे पाच दिवस अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दाखल अर्जांची दोन जूनला छाननी होईल. तीन ते १७ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी १८जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर २९ जूनला मतदान तर एक जुलैला मतमोजणी होणार आहे.