आनंदराव देवकर
आनंदराव देवकर

कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांची दि.२९ जुलै रोजी बदली झाली आहे. बदली आदेशात सर्वात गंभीर असा शेरा मारला असून सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारण बदली आदेशात देण्यात आल्याचे म्हंटले आहे. ही बदली कराड तहसीलदार यांच्या विरुद्ध तक्रारीमध्ये सकृतदर्शनी तथ्य असल्याचेही पुणे विभागीय आयुक्त याचा अहवाल मंत्रालयीन पातळीवर दाखल झाला आहे.

  कराड : कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांची दि. २९ जुलै रोजी बदली झाली. मात्र गेल्या महिनाभर त्यांनी नियुक्तीच्या जागी हजर राहण्याचे टाळले. आयुक्तांचे तातडीचे बदली आदेश असताना त्यांच्या आदेशाला जिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार वाकडे यांनी केराची टोपली दाखवली.संपूर्ण सातारा जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना कराडचा कार्यभार देण्यासाठी महिनाभरात सक्षम अधिकारी मिळाला नाही. अखेर महसूल विभागाचे मंत्रालयीन सचिव नितीन करीर यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कराडचे नायब तहसीलदार आनंदराव देवकर याच्याकडे तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपण्यात आला आहे. त्यामुळे महिना भराने का होईना जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी मिळाला असेच म्हणावे लागेल.

  कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांची दि.२९ जुलै रोजी बदली झाली आहे. बदली आदेशात सर्वात गंभीर असा शेरा मारला असून सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारण बदली आदेशात देण्यात आल्याचे म्हंटले आहे. ही बदली कराड तहसीलदार यांच्या विरुद्ध तक्रारीमध्ये सकृतदर्शनी तथ्य असल्याचेही पुणे विभागीय आयुक्त याचा अहवाल मंत्रालयीन पातळीवर दाखल झाला आहे. आदेश मिळताच तातडीने कराडचा पदभार तात्काळ सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याच्या सूचना सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. तरीही कराड तहसीलदार गेली महिनाभर कारभार पाहत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना मिळेना सक्षम अधिकारी अशी उलटसुलट चर्चा तालुक्यातील जनतेत सुरू होती.

  तहसीलदार अमरदीप वाकडे यांची बदली होऊनही पदभार सोडत नसल्याने नक्कीच काहीतरी काळेबेरे केले असल्याबाबत चर्चा आहे. तर आपल्या केलेला चुकीचा कारभार सरळ करण्यासाठी तर वाकडे यांना पाठीशी घातले जात नाही ना अशी चर्चा आहे.

  गैरकामाची पाळेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
  चौकशी दरम्यान दोषी आढलेल्या अधिकाऱ्याला वरिष्ठ का पाठीशी घालत आहेत, हे न उलगडणारे कोडे असून केलेल्या गैर कामाची पाळेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तर गेली नाहीत ना अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

  जिल्हाधिकारी खुलासा करणार?
  सातारा जिल्हाधिकारी यांनी पुणे विभागीय आयुक्त यांनाही कोलदांडा दिला असून आयुक्तांनी केलेली चौकशी व दिलेला अहवाल जिल्हाधिकारी यांच्या बोटचेपे धोरणाने कुचकामी ठरला असून कराड तहसीलदार यांनी बदलीनंतर गत एक महिन्यात आपल्यावरील झालेल्या आरोपांच्या सर्व कागदपत्रात फेरफार केली असल्याचीही चर्चा आहे. प्रत्यक्ष चौकशीत काहीही निष्पन्न होऊ नये यासाठीच बदलीनंतरचा कालावधी सक्षम अधिकारी यांच्याकडे न देता तो अमरदीप वाकडे यांच्याकडे ठेवण्यात आला याचे नेमके कारण काय? याचा खुलासा जिल्हाधिकारी करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.