दहिवडी नगरपंचायत कार्यालयात आग ; बांधकाम विभागाची महत्वाची कागदपत्रे जळून खाक

विशेषतः बांधकाम विभागाच्या फायली व कागदपत्रे जळली असल्याचे बोलले जात आहे. आग नक्की कशामुळे लागली,शॉर्ट सर्किट झाले असले तरी निष्काळजीपणा भोवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सद्या शासनाच्या मार्च एन्ड ची सर्वत्र लगबग सुरु असून सर्वात जास्त गर्दी ही बांधकाम खात्यात दिसून येत आहे

    दहिवडी : दहिवडी ता माण येथील दहिवडी नगरपंचायत कार्यालयात विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. या आगीमध्ये नगरपंचायत कार्यालयातील खुर्च्या, टेबल,सह महत्त्वाच्याफाईल्स व विविध कागदपत्रे जळाली आहेत.

    विशेषतः बांधकाम विभागाच्या फायली व कागदपत्रे जळली असल्याचे बोलले जात आहे. आग नक्की कशामुळे लागली,शॉर्ट सर्किट झाले असले तरी निष्काळजीपणा भोवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सद्या शासनाच्या मार्च एन्ड ची सर्वत्र लगबग सुरु असून सर्वात जास्त गर्दी ही बांधकाम खात्यात दिसून येत आहे.नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आहे.