पाचगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे अँब्युलन्सची चार गाड्यांना धडक ; गाड्यांचे मोठे नुकसान

खेड येथील अँब्युलन्स रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मयतला घेवून आली होती.त्यानंतर परतानाना ही अँब्युलन्स वाई घाट चढून पहाटे पाचगणी मध्ये आली होती. पाचगणी येथील शिवाजी चौकात आली असता तेथे पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या (MH१२ MF ८१२५,MH ११ CD ६६३८,MH ११ BF १११०,MH१२ RT २०९६,) या चार गाड्यांना धडक दिल्याने या चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

    पाचगणी : पाचगणी ( तालुका महाबळेश्वर ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडे पाच वाजता अँब्युलन्सने चार गाड्यांना धडक दिल्याने चारही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, खेड येथील अँब्युलन्स रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मयतला घेवून आली होती.त्यानंतर परतानाना ही अँब्युलन्स वाई घाट चढून पहाटे पाचगणी मध्ये आली होती. पाचगणी येथील शिवाजी चौकात आली असता तेथे पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या (MH१२ MF ८१२५,MH ११ CD ६६३८,MH ११ BF १११०,MH१२ RT २०९६,) या चार गाड्यांना धडक दिल्याने या चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही धडक एवढी जोरदार होती की या सर्व गाड्या मागच्या बाजूने एकमेकांवर आदळल्या त्यामुळे या गाड्यांचा मागील बाजूचा चक्काचूर झाला.पाचगणी पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.