दोन कारच्या धडकेत चार जखमी; पसरणी घाटातील घटना

अपघातात कारमधील चालक, पती पत्नी व मुलगा असे चौघे किरकोळ जखमी झाले. त्य‍ांना उपचारासाठी पाचगणी येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र कदम, संजय मोतेवार, सहायक फौजदार कोळी, पोलिस हवालदार मोहिते, मदने, गोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली

    वाई : वाई महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटातील दत्त मंदिरानजीक दोन कारच्या झालेल्या धडकेत मारुती कारचालक, पती, पत्नी व मुलग‍ा किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर झालेली व‍ाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली. पसरणी घाटामधील दत्त मंदिरा नजिक महाबळेश्वरहून वाईकडे येणारी कार (एमएच १२ एसई ६६५९) व महाबळेश्वरकडे निघालेली कार (एमएच १२ एफएफ २१८२) या गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील चालक, पती पत्नी व मुलगा असे चौघे किरकोळ जखमी झाले. त्य‍ांना उपचारासाठी पाचगणी येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र कदम, संजय मोतेवार, सहायक फौजदार कोळी, पोलिस हवालदार मोहिते, मदने, गोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ होती. अपघातामुळे झालेली व‍ाहतुक कोंडी पोलिसांनी सुरळित केली. अपघातातील कार रस्त्याच्या कडेला हलविल्या. अपघातातील जखमींना उपचारासाठी पाठविले. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास वाई पोलिस करित आहेत.